-
पुणे : नाच, गाणी, मर्दानी खेळ अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी रविवारी वाहनमुक्त रस्त्याचा अनुभव घेतला.
-
आकर्षक पद्धतीने रंगविलेले रस्ते, रस्त्यावर विनाअडथळा फिरणारे पादचारी, रस्त्यावर खेळणारी लहान मुले, सारंगीचे मधूर सूर, असे उत्साही वातावरणाचा अनुभव पादचारी दिनानिमित्त पादचाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर घेतला.
-
पादचाऱ्यांना अडळामुक्त मार्गक्रमण करता यावे, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने रविवारी लक्ष्मी रस्त्यासह २१ रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले.
-
लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात आला.
-
या ठिकाणी वॉकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले.
-
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे सकाळी उद्घाटन झाले.
-
एरवी लक्ष्मी रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गर्दी असेच चित्र दिसून येते. पादचारी दिनानिमित्त रविवार त्याला अपवाद ठरला.
-
पादचाऱ्यांनी मोकळ्या वातावरणाचा अनुभव घेतला.
-
पादचारी दिनानिमित्त रस्त्याला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती.
-
शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, सारंगीचे सूर, बॅण्डच्या तालावर थरकणारी तरूणाई असे वातावरण या रस्त्यावर दिसून आले.
-
विना अडथळा चालण्याचा अनुभवही पादचाऱ्यांनी यानिमित्ताने घेतला. उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान पादचारी दिन साजरा करण्यात आला.
-
लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद आज सकाळपासून ठेवण्यात आली होती. पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे.

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या