-
‘रुद्र..’ दोन वाघांचे साम्राज्य मोडीत काडून स्वत:चे साम्राज्य स्थापन करणारा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील या वाघाची कथाच न्यारी.
-
‘कानकटा’ हा वाघ आणि ‘शिवांझरी’या वाघिणीचा हा मुलगा.
-
‘ताला’ आणि ‘रुद्र’चा जन्म एकाचवेळी झाला. त्यांना आणखी भावंडे होती.
-
‘लंगडा’ आणि ‘कॉलरवाली’, जे नंतर उमरेड-करांडला अभयारण्याकडे गेले.
-
कोळसा परिसरात शिवंझरी येथे ‘रुद्र’चा जन्म झाला.
-
या परिसरात नेहमीच धिप्पाड, मोठ्या वाघांचा जन्म झाला. ‘रुद्र’ही तसाच.
-
तो जेथे जातो तेथे तो जणूकाही लढण्यासाठीच जातो, असा त्याचा एकूण वावर असतो.
-
‘मटकासूर’ आणि ‘बजरंग’ जोडीला मोडीत काढणारा पहिला ‘रुद्र’च होता.
-
तो २०१९च्या उत्तरार्धात आला आणि ‘मटकासूर’शी सतत युद्ध करत होता.
-
त्याने ‘मटकासूर’ला त्याने वाईटरित्या मारहाण केली आणि स्वत:ला देखील जखमी करुन घेतले.
-
‘रुद्र’सह त्याचा भाऊ ‘ताला’ने बलाढ्य बजरंगवर विजय मिळवला.
-
मात्र, तेलिया तलावाजवळ त्याला पराभव पत्करावा लागला.
-
त्यानंतर पद्धतशीरपणे दोन्ही भाऊ ‘ताला’ आणि ‘रुद्र’ यांनी ‘मटकसूर’ला त्याच्या प्रदेशातून बाहेर काढले.
-
डिसेंबर २०१९ मध्ये मात्र दोन्ही भाऊ एकमेकांविरुद्ध लढले. ‘रुद्र’ने ‘ताला’ला हरवत ‘माया’ या वाघिणीला आपले बनवले. नंतर दोन्ही भाऊ एकत्र देखील आले.
-
सर्व छायाचित्रे – अरविंद बंडा (हेही पाहा : विक्रम मोडणारी ताडोबाची ‘सुपर मॉम माधुरी’)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य