-
अंडं आधी की कोंबडी? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात टाकतो. कुणी म्हणतं अंडं तर कुणी म्हणतं कोंबडी.(photo: graphics team loksatta)
-
पण जर अंडं म्हटलं तर मग ते कुठून आलं कारण अंडं कोंबडीच देते आणि कोंबडी म्हटलं तर मग ती कुठून आली कारण कोंबडी अंड्यातूनच बाहेर येते.(photo: freepik)
-
त्यामुळे या प्रश्नाचं या दोघांपैकी अचूक उत्तर कोणते ते आपल्याला सहज सांगता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाला जगातील सर्वात कठीण प्रश्न म्हटला तरी चालेल.(photo: freepik)
-
तर याच प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे. होय, शास्त्रज्ञांनी याचं उत्तर शोधून काढलं आहे.(photo: freepik)
-
अंडं आधी की कोंबडी यावर यूकेतील शेफील्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या शोधानंतर त्यांना याचं योग्य उत्तर सापडलं आहे.(photo:file photo)
-
त्यांनी केलेल्या संशोधनानुसार जगात अंड्याआधी कोंबडी आली होती. या उत्तराचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. तसंच त्यांनी याचं एक खास कारणही सांगितले आहे.(photo: file photo)
-
संशोधनात असं स्पष्ट झालं की, अंड्याच्या कवचेत एक ओवोक्लाइडिन नावाचं प्रोटिन असतं. याशिवाय अंड्याचं कवच बनू शकत नाही. हे प्रोटिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयात तयार होतं.(photo:file photo)
-
जेव्हा कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनचा अंड्याच्या निर्मितीत वापर होतो, तेव्हाच अंडं बनू शकतं.(photo:freepik)
-
त्यामुळे जगात अंड्याआधी कोंबडी आली हे पक्कं झालं आहे. जेव्हा कोंबडी आली तेव्हाच तिच्या गर्भाशयात ओवोक्लाइडिन बनलं आणि मग या प्रोटिनमुळे अंड्याची निर्मिती झाली.(photo: freepik)

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता