-
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
-
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले.
-
‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
-
राहुल शेवाळे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची माहिती अद्याप जनतेपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.”
-
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबतची उत्तरं जनतेला मिळायला पाहिजे.- राहुल शेवाळे
-
सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला फोन कॉल आले होते. याचा उल्लेख बिहार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. ते कॉल ‘एयू’ (AU) या नावाने आले होते. – राहुल शेवाळे
-
रिया चक्रवर्तीच्या कायदेशीर टीमने ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा लावला. तर मुंबई पोलिसांनी याबाबत कुठलाही खुलासा केला नाही. – राहुल शेवाळे
-
बिहार पोलिसांनी जो तपास केला, त्यानुसार ‘एयू’चा अर्थ ‘आदित्य उद्धव ठाकरे’ असा होतो. ही माहिती मला मिळाली आहे. – राहुल शेवाळे
-
सीबीआयने याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आणली नाही. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती काय आहे? हे समोर यावी, याची विनंती मी गृहमंत्र्यांकडे केली आहे. – राहुल शेवाळे
-
राहुल शेवाळेंनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत केलेल्या गंभीर आरोपाला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. यावरून लक्ष हटवण्यासाठी राहुल शेवाळे यांनी आपल्यावर आरोप केले आहेत. – आदित्य ठाकरे
-
महाराष्ट्राचे विषय बाजुला जावेत, म्हणून असे घाणेरडे विषय काढून बदनामी केली जात आहे. यामध्ये मला जायचे नाही. मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. – आदित्य ठाकरे
-
मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राद्वेषी राज्यपालांना वाचवण्यासाठी असे घाणेरडे विषय बाहेर काढले जात आहेत. – आदित्य ठाकरे
-
मी राहुल शेवाळेंना काडीमात्र किंमत देत नाही. त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं, हे मला माहीत आहे. – आदित्य ठाकरे
-
मला काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही. कारण माझे तसे संस्कार नाहीत. म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. – आदित्य ठाकरे

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख