-
हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरुन घमासान सुरू आहे. २०२१मध्ये मृत्यू झालेली दिशा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहत होती.
-
१४ जून २०२१ला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्याआधीच काही दिवस म्हणजे ९ जूनला दिशाने मुंबईतील मालाडमधील राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं.
-
दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरुन उडी मारली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला होता.
-
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरेंचं नाव त्यावेळी विरोधी पक्षात बसलेल्या पक्षाकडून घेतलं जात होतं.
-
आता पुन्हा हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंचं नाव घेत हे प्रकरण सत्ताधारी पक्षाकडून उचलून धरलं जात आहे.
-
दिशा सालियनने आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, हे जाणून घेऊया.
-
दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या रात्री काय झालं होतं, याचा खुलासा तिच्या एका जवळच्या मित्राने ‘इंडिया टुडे’शी बोलताना केला होता.
-
“९ जूनच्या रात्री तिचे काही मित्र व बॉयफ्रेंड रोहनसह ती पार्टी करत होती. त्यावेळी ती थोडी दारुही प्यायली होती”, असं दिशाचा मित्र म्हणाला.
-
पुढे तो म्हणाला, “सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक ‘कोणालाच कोणाची काळजी नाही’, असं म्हणत तिने स्वत:ला बेडरुममध्ये बंद करुन घेतलं”.
-
“काहीवेळाने तिच्या मित्रांनी बेडरुमचा दरवाजा ठोठावला. बराच वेळ दिशाने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने नंतर नाईलाजाने बेडरुमचा दरवाजा आत तोडून ते आतमध्ये गेले”.
-
“दिशाने बाल्कनीतून उडी मारल्याचं त्यांना कळताच ते थेट खाली उतरले. तोपर्यंत वॉचमॅनने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती”, असंही पुढे तो म्हणाला.
-
“जेव्हा दिशाला तिच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा ती जिवंत होती. पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं”, असा खुलासा तिच्या जवळच्या मित्राने केला होता.
-
मालाडमधील ते घर दिशा व तिचा बॉयफ्रेंड रोहन यांनी खरेदी केलं होतं. ते लवकरच लग्न करणार होते. त्यांच्यात छोटे-मोठे वाद सुरू होते. परंतु, एवढं गंभीर काहीच नसल्याचंही त्याने सांगितलं होतं.
-
(सर्व फोटो: दिशा सालियन/ फेसबुक)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO