-
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे.
-
अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. लवकरच दोघांचं लग्न होणार आहे.
-
राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमांचा भाग असते.
-
अनंत आणि राधिका मागच्या काही वर्षांपासून एकत्र आहेत.
-
दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. अशातच आता दोघांचाही साखरपुडा झाला आहे.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला.
-
नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात त्यांचा साखरपुडा झाला.
या प्रसंगी अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय उपस्थित होते. -
राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे.
-
राधिका मर्चंटचा जन्म १६ डिसेंबर १९९४ रोजी झाला. ती आता २८ वर्षांची आहे.
-
गुरु भावना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने श्री निवा आर्ट्समधून भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे.
-
राधिका गुजराती असून बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण झालं.
-
त्यानंतर तिने मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.
-
राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. तिला अभ्यासाची आवड आहे.
-
पदवीनंतर ती भारतात परतली आणि एका रिअल इस्टेट फर्ममध्ये काम करू लागली. मात्र, तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण सुरू ठेवलं .
-
अनंत अंबानी व्यतिरिक्त, राधिकाचे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा यांच्याशीही छान जमतं.
-
या वर्षाच्या मध्यात अंबानी कुटुंबीयांनी राधिकासाठी ‘अरंगेत्रम’ सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
-
त्यानंतर राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांचा साखरपुडा पार पडला आहे.
-
(सर्व फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”