-
20 Crores Rupees Dog: बंगळुरू मध्ये एका माणसाकडे असा एक कुत्रा आहे जो सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटीजपेक्षा जास्त व्हायरल होत आहे. या कुत्र्याच्या खरेदीसाठी त्याच्या मालकाकडे तब्बल २० कोटींची ऑफर आली आहे.
-
या महागड्या कुत्र्याच्या मालकाचे नाव सतीश एस. असे असून ते प्रसिद्ध डॉग ब्रीडर आहे. सतीश हे इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्स नुसार बंगळुरूच्याच एका बिल्डरने या कुत्र्याला खरेदी करण्यासाठी सतीश यांना २० कोटीची ऑफर सुद्धा दिली आहे.
-
सतीश ने आपल्या कॉकेशियन शेफर्ड चे नाव “Cadaboms Hayder” असे ठेवले आहे. दीड वर्षाच्या कुत्र्याचे वजन जवजवळ १०० किलो आहे.
-
प्राप्त माहितीनुसार या कुत्र्याची उंची ३८ इंच व खांद्याची लांबी ३४ इंच आहे. या कुत्र्याचा एक एक पाय हा २ लिटरच्या कोल्ड ड्रिंकच्या बॉटलच्या आकाराचा आहे.
-
सतीश यांनी आपल्या लाडक्या मित्राला विकण्यास नकार दिला आहे. (Photo: @satishcadaboms/Instagram)
-
अलीकडेच गायिका टेलर स्विफ्टच्या स्कॉटिश मांजरीची सुद्धा अशीच चर्चा रंगली होती.
-
ऑलिव्हिया बेन्सन नावाची ही मांजर जगातील तिसरी सर्वात महागडी मांजर असून तिची किंमत सुमारे ८०० कोटी इतकी आहे.
-
ऑलिव्हिया बेन्सनंतर जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मांजरीचं नाव नाला कॅट असं आहे.
-
@Nala_Cat चे इंस्टाग्रामला ४४ लाख फॉलोवर्स असून तिची अंदाजे किंमत ८२५ कोटी रुपये आहे.
-
जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत आणखी एक कुत्रा आहे.
-
जर्मन शेफर्ड जातीच्या ‘गुंथर 6’ ची किंमत तब्बल ४००० कोटी इतकी आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल