-
राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने बुधवारी(११ जानेवारी) छापे टाकले.
-
मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
-
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती आहे.
-
हसन मुश्रीफ यांच्या एकूण संपत्तीवर नजर टाकूया.
-
हसन मुश्रीफ यांनी ६ लाख ५ हजार रुपये शेअर्समध्ये गुंतवले आहेत.
-
एलआयसीमध्ये ९ लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आहे.
-
मुश्रीफ यांच्याकडे इनोव्हा व फॉरच्यून या महागड्या गाड्या आहेत. तर हिंदुस्थान कंपनीचं ट्रॅक्टरही त्यांच्या नावावर आहे.
-
मुश्रीफ यांच्याकडे ५ लाखांचे तर त्यांच्या पत्नीच्या नावे १६ लाखांहून जास्त किमतीचे सोन्याचे दागिने आहेत.
-
मुश्रीफ व त्यांच्या पत्नीच्या नावावर कागल व कारनूर येथे एकूण ३ कोटी १४ लाखांच्या शेतजमीन आहे.
-
कागल परिसरात त्यांच्या नावे ४९ लाखांची व्यावसायिक मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर पुण्यातील पर्वती येथे एक कोटी किमतीची व्यावसायिक मालमत्ता आहे.
-
मुश्रीफ यांच्या नावावर कागल व अंधेरी येथे फ्लॅट आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे ४५ लाख व एक कोटी इतकी आहे.
-
मुश्रीफ यांच्या पत्नी एकूण चार फ्लॅटच्या मालक आहेत. त्यापैकी कागल परिसरात एक व कोल्हापूर परिसरात तीन घरे आहेत. यांची एकूण किंमत १०५ कोटींच्या घरात आहे.
-
मुश्रीफ यांनी एकूण २१ लाख तर त्यांच्या पत्नीने ७४ लाखांचं कर्ज घेतलं आहे.
-
हसन मुश्रीफ एकूण दहा कोटी संपत्तीचे मालक आहेत. (सर्व फोटो: हसन मुश्रीफ/ फेसबुक)
-
हसन मुश्रीफ यांनी वरील माहिती ही निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात नमूद केली आहे. (हेही पाहा>> Photos: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं चाहत्यांना ‘याड लागलं’; नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”