-
काही वर्षांपूर्वी ज्याने अवघ्या महाराष्ट्राला, देशालाच नाही तर विदेशातील वन्यजीवप्रेमींनाही वेड लावले, असा रांगडा गडी म्हणजेच उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ हा वाघ.
-
जेवढ्या लवकर तो वन्यजीवप्रेमींच्या नजरेत भरला, तेवढ्याच वेगाने तो बेपत्ता झाला. खरं तर त्याचा वीज प्रवाहाने मृत्यू झाला, पण आजही वनखाते ते मानायल तयार नाही.
-
अशा या वाघाचा जन्म झाला तो नागझिरा अभयारण्यात. साधारण दोन वर्षे वयानंतर वाघ शिकारीला सरावतो, पण याने दीड वर्षाचा असतानाच रानम्हशीची शिकार केली.
-
त्याचा रुबाबच असा होता की ‘याची देही, याची डोळा’ त्याला पाहण्यासाठी सारेच उत्सुक असत. कधी तो राष्ट्रीय महामार्गावर बसलेला दिसायचा तर कधी नदीच्या प्रवाहात. त्याच्या अधिवासाची सीमाच नव्हती.
-
सप्टेंबर २०१३ मध्ये नागझिरा अभयारण्यातून १५० किलोमीटरचे अंतर पार करत स्थलांतर करुन उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात पोहोचला.
-
या अभयारण्याचे क्षेत्र होते १९० किलोमीटर आणि ‘जय’ फिरत होता तब्बल ५५० किलोमीटर.
-
त्याची ख्याती जगभरात पोहोचल्यानंतर चित्रपट जगतातील, क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी त्यांचा मोर्चा उमरेड-पवनी-करांडला अभयारण्याकडे वळवला.
-
भारतातला हा एकमेव वाघ असावा, जो मृत्यूनंतरही तेवढाच प्रसिद्ध आणि तेवढाच चर्चेत आहे.
-
सर्व छायाचित्रे – प्रफुल्ल सावरकर (हेही पाहा : साम्राज्य मोडीत काढणारा ‘रुद्र’)

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य