-
देशात सर्वात मोठा ऑटो शो ‘ऑटो एक्स्पो’ (Auto expo 2023) यंदा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या शो मध्ये देश विदेशातील बड्या वाहन कंपन्यांनी आपली जबरदस्त वाहने अनवील केले आहेत. चला एक नजर टाकूया या वाहनावर..
-
Kia Concept EV9: सोळाव्या ऑटो एक्स्पोमध्ये, दक्षिण कोरियाची ऑटोमेकर Kia ने तिच्या नवीन EV9 संकल्पनेसह आणि नवीन KA4 MPV सह त्यांची विस्तृत वाहन श्रेणी सादर केल्या आहेत.
-
Hyundai Loniq 5 Ev: ऑटो एक्सपोमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते ह्युंदाईच्या Loniq 5 EV कारचे सादरीकरण करण्यात आले. लवकरच ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल केली जाणार आहे.
-
Maruti Suzuki Fronx: Fronx, Maruti Suzuki च्या Baleno-आधारित SUV कूपचे ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनावरण झाले असून या नवीन SUV कूपची विक्री एप्रिलपर्यंत ब्रँडच्या Nexa आउटलेट्सद्वारे केली जाईल.
-
Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये बहुप्रतिक्षित ‘SUV Maruti Suzuki Jimny 5 door’ लाँच केली आहे. ४ मीटरपेक्षा कमी लांबीची जिमनी खूपच आकर्षक दिसते आहे.
-
MG5 Electric Car: MG Motors ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये ‘MG5’ इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. ही इलेक्ट्रिक कार आधीच युरोपच्या बाजारपेठेत विकली जात आहे.
-
Vayve EVA: पुण्यातील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप Vayve Mobility ने Auto Expo 2023 मध्ये सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार Vayve EVA सादर केली आहे.
-
Pravaig Defy Electric SUV: बेंगळुरू येथील स्टार्टअप Pravaig Dynamics ने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये Pravaig Defy Electric SUV तसेच देशातील जवानांसाठी खास ‘प्रवेग वीर’ अनवील केली आहे.
-
Tata Motors Altroz Racer: टाटा मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये Altroz Racer स्पोर्टी हॅचबॅक सादर केली आहे. स्पोर्टी लुकसोबतच फीचर्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. लॉन्च करण्यासोबतच कंपनीने त्याची बुकिंगही सुरू केली आहे.
-
Tata Sierra EV: टाटाने आपली सिएरा ईव्ही एसयूव्ही हे मॉडेल लाँच केले. टाटा सिएरा एसयूव्हीमध्ये मोठे एलईडी डीआरएल, मोठे ड्युअल टोन बंपर , स्केअर फॉग लॅम्प , ड्युअल टोन अॅलॉय व्हील आणि फ्लॅश डोअर हॅन्डल असे फीचर्स आहेत.
-
Tiago EV Blitz: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्स Tata Tiago EV Blitz सादर केली आहे. कंपनीने स्पोर्टी डिझाइन आणि हाय-टेक वैशिष्ट्यांसह ही कार तयार केली आहे. EV मध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे.
-
यंदाचा ऑटो एक्स्पो यशस्वीरित्या संपला. यंदाच्या ऑटो एक्स्पोने सर्व रेकॉर्ड तोडले, एकूण ६ लाख ३६ हजार ७४३ लोकांनी या ऑटो एक्स्पोला भेट दिली. (फोटो सौजन्य: financialexpress)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”