-
भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अथिया शेट्टी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
-
अथिया ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.
-
के.एल.राहुलने उत्तम खेळाच्या जोरावर क्रिकेट विश्वात नाव कमावलं.
-
क्रिकेटर के.एल.राहुल व अथिया शेट्टी यांची पहिली भेट त्यांच्या एक कॉमन फ्रेंडमुळे झाली होती.
-
एका कार्यक्रमामध्ये ते एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात घट्ट मैत्री झाली.
-
राहुल आणि अथियाला अनेक पार्टी, कार्यक्रमांत एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
-
अनेक दिवस डेट केल्यानंतर ते काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
-
त्यानंतर राहुलने अथियाच्या वाढदिवशी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
-
अनेक मुलींचा क्रश असणाऱ्या के.एल.राहुलची विकेट अथिया शेट्टीने घेतली.
-
आता विवाहबंधनात अडकून ते त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
-
के.एल.राहुल व अथिया सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर लग्नगाठ बांधणार आहेत.
-
(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”