-
भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत.
-
सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत अथिया व राहुलने लग्नगाठ बांधली.
-
अथिया व के.एल.राहुलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नासाठी अथियाने बदामी रंगाचा लेहेंगा परिधान करत शाही लूक केला होता.
-
खड्यांच्या ज्वेलरीचा साज करत नववधू नटलेली पाहायला मिळाली.
-
तर के.एल.राहुलने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. वराच्या पेहरावात के.एल.राहूल राजबिंडा दिसत होता.
-
के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.
-
आता सात फेरे घेत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
त्यांच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो: अथिया शेट्टी/ इन्स्टाग्राम)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी