-
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या काही दिवसातच आणखी एका भारतीय क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकला.
-
अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल आणि त्याची प्रेयसी मेहा पटेल यांचा काल रात्री, २६ जानेवारी रोजी गुजरातमधील वडोदरा येथे विवाह झाला.
-
अक्षर आणि मेहा यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.
-
अक्षर पटेलने जानेवारी २०२२ मध्ये त्याची प्रेयसी मेहाला प्रपोज केले होते आणि यावर्षी २५ जानेवारीला दोन्ही कुटुंबांनी त्यांचा मेहंदी सोहळा साजरा केला.
-
याच पार्श्वभूमीवर, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल यांची बायको मेहा पटेल कोण आहे, याबद्दल आज आपण तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
-
अक्षर पटेल यांची पत्नी मेहा आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ म्हणून काम करते.
-
मेहाने डीटी नावाची कंपनीही सुरू असून ती तिच्या सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन करते.
-
मेहाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या सहलीतील अनेक फोटो शेअर करत असते.
-
मेहाने तिच्या हातावर अक्षरच्या नावाचा टॅटूही काढला आहे.
-
लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, अक्षर पटेल आणि मेहा एकमेकांना बराच काळ डेट करत होते. २० जानेवारी २०२२ रोजी अक्षरने मेहाला प्रपोज केले.
-
मेहाला प्राणी खूप आवडतात. तिच्याकडे गुची नावाचा एक कुत्रा असून अलीकडेच अक्षर आणि मेहाने त्याचा दुसरा वाढदिवस साजरा केला.
-
मेहा डीटी नावाची पोषण कंपनी चालवते. याच्याशी निगडीत तिचे एक व्यावसायिक इन्स्टाग्राम अकाउंट असून त्यावर ती निरोगी आहार आणि पोषणबद्दल पोस्ट करते.
-
याव्यतिरिक्त तिचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंटही आहे. यावर तिला जवळपास २८ हजार लोक फॉलो करतात.
-
सर्व फोटो: Instagram
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख