-
उद्योगपती गौतम अदाणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. न्यूयॉर्कमधील ‘हिंडेनबर्ग संस्थे’ने जाहीर केलेल्या अहवालात गौतम अदाणी व त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप केले आहेत.
-
अदाणींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेकडून करण्यात आला आहे.
-
तसंच गेल्या काही दशकांपासून अदाणी समुहाकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोपही हिंडनबर्ग संस्थेने केला आहे.
-
त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अदाणींच्या कंपन्यांचं शेअर्स गडगडले आहेत. याचे तीव्र पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहेत.
-
दोन दिवसांत शेअर बाजार एक हजार ६४७ अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे अदाणी समुहाचे दोनच दिवसांत तब्बल ४.१७ कोटींचं नुकसान झालं आहे.
-
गौतम अदाणी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. परंतु, हिंडेनबर्ग संस्थेच्या आरोपांनंतर त्यांच्या संपत्तीत घट होऊन ते चौथ्या स्नाथावर घसरले.
-
त्यानंतर आता फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदाणी थेट सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.
-
२५ जानेवारीला अदाणी यांची एकूण संपत्ती ९.२० लाख कोटी इतकी होती.
-
त्यात जवळपास १९ टक्क्यांनी घट झाली आहे. आता अदाणी एकूण ७.७६ लाख कोटींचे मालक आहेत.
-
गेल्या तीन वर्षांत अदाणींच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१९ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातं. अदाणींच्या संपत्तीमध्ये तब्बल १०० बिलियन डॉलर्सची वाढ झाली होती.
-
(सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)
२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार