-
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सत्यजीत तांबे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.
-
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडूण आले आहेत.
-
पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी देण्यात आली होती.
-
परंतु, अखरेच्या क्षणी सुधीर तांबेंनी माघार घेत सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
बंडखोरी केल्यामुळे त्यांचं काँग्रेसमधून निलबंन करण्यात आलं होतं.
-
काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर अपक्ष म्हणून निवडूण आलेले सत्यजीत तांबे कोण आहेत, जाणून घेऊया.
-
सत्यजीत तांबे हे डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत.
-
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत.
-
सत्यजीत तांबे २००० सालापासून राजकारणात सक्रिय आहेत.
-
२००७ साली वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी जिल्हा परिषदेचे ते सदस्य झाले.
-
२०१८ साली ते पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडूण गेले होते.
-
काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील युवा अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख आहे.
-
सत्यजीत हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
ते स्वत: एक उद्योजक असून व्यवसाय व गुंतवणूक क्षेत्रातील माहितीपर व्याख्यानं तरुण पिढीला देत असतात.
-
सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली या डॉक्टर असून त्यांना अहिल्या व सूर्यी ही दोन मुले आहेत. (सर्व फोटो: सत्यजीत तांबे/ इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल