-
रोहित पवार हे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक लोकप्रिय नाव.
-
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून ते कायमच चर्चेत असतात.
-
महाविकासआघाडीची सत्ता असताना आणि आता सत्ता गेल्यानंतरही ते सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
-
रोहित पवारांच्या राजकीय भूमिकांसह त्यांच्या स्टाईलचीही चर्चा सातत्याने रंगताना दिसते.
-
रोहित पवार हे कायमच जिन्स, इन न करता घातलेले शर्ट, जॅकेट, स्कार्फ अशा लूकमध्ये दिसतात.
-
त्याबरोबर ते कायमच पायात कोल्हापुरी चप्पल, मोजडी, लोफर्स असे परिधान केलेले असतात.
-
तसेच ते अनेकदा रंगबेरंगी शर्टही परिधान करतात.
-
रोहित पवारांच्या या हटके स्टाईलबद्दल अनेकांना प्रश्न पडलेला असतो.
-
नुकतंच एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या या स्टाईल करण्यामागची काही कारणं सांगितली आहेत.
-
यावेळी त्यांनी उपस्थित लोकांपैकी किती लोक अशी स्टाईल करतात हे विचारले.
-
त्यावर उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी हात वर केला आणि त्याला होकार दिला.
-
त्यापुढे ते म्हणाले, “मी या सर्वांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हे जसे वागतात तसा मी वागतो. मग यात फरक काय? असे त्यांनी म्हटले.”
-
“कॉलेजमध्ये असताना व्यायाम करायचो. पण आता वजन वाढलंय, त्यामुळे शर्ट गच्च व्हायला लागलेत.”
-
“आपण कायमच आपल्या स्टाईलमध्ये राहायचं. लोकांच्या चांगल्या गोष्टी नक्कीच ऐकायच्या.”
-
“पण सर्वच गोष्टी जर तुम्ही त्यांच्या ऐकायला लागल्यात तर मग तुमची स्टाईलच राहणार नाही.”
-
“त्यामुळे आपण आपली स्टाईल ठरवायला हवी.”
-
“मला अनेकांनी राजकारणात आल्यानंतर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करण्याचा सल्ला दिला होता.”
-
“मी त्यावेळी त्यामागील कारणही त्यांनी विचारले होते.”
-
त्यावर ती लोक मला म्हणालेली, “पांढरे कपडे घातले की आपली प्रतिमा स्वच्छ दिसते.”
-
“पण हे दाखवायचं कशाला? आपण स्वच्छ प्रतिमा असल्यासारखे वागलो तर लोकांना ते कळेलच.”
-
“माझ्या घरी माझ्या केसांवरुन फार भांडण होतात.”
-
“माझी पत्नी कुंती आणि दोन मुलं मला कायम केस काळे करण्याचा सल्ला देतात.”
-
“माझे केस हे कृत्रिमरित्या पांढरे झालेले नाही. ते नैसर्गिकरित्या पांढरे झाले आहेत.”
-
“माझं वय हे ३७ पूर्ण झालं आहे. आता ३८ सुरु आहे.”
-
“मी राजकारणात आलो होतो, तेव्हा हे केस २५ टक्के पांढरे झाले होते.”
-
“वय कमी होतं त्यामुळे तेव्हा कोणीही गांभीर्याने घेत नव्हतं.”
-
“पण त्यावेळी या केसांनी फार मदत केली.”
-
“आता हे नैसर्गिकरित्या झालेत आणि राजकारणात आल्यानंतर ते ७० टक्के झाले आहेत.”
-
“काय तरी काम केलं, विचार करतो म्हणून केस पांढरे झालेत असे मी लोकांना सांगतो.”
-
“आपण आपल्या स्टाईलमध्ये राहायचं. खूप लपवालपवी करायची नाही.”

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”