-
ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथीय कपल लवकरच आईबाबा होणार आहेत.
-
केरळमध्ये वास्तव्यास असलेले साहद व झिया गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत.
-
तृतीयपंथीय मूल जन्माला घालणार असल्याचं हे भारतातील पहिलंच प्रकरण आहे.
-
सोशल मीडिया पोस्टद्वारे झियाने ही माहिती दिली आहे.
-
साहद व झिया यांनी मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.
-
तृतीयपंथी कपलने मॅटर्निटी फोटोशूटसाठी हटके पोझही दिल्या आहेत.
-
साहद व झियाच्या या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
-
या तृतीयपंथी कपलचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
२३ वर्षीय साहद व २१ वर्षीय झियाने लिंग परिवर्तनासाठी हार्मोन थेरेपी केली आहे.
-
साहदने स्तन काढल्यामुळं आम्ही बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बँकेतून दुधाची उपलब्धता करुन देऊ, असंही झियाने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं.
-
कोझीकोडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी यासाठी आम्हाला मदत केल्याचंही झियाने म्हटलं आहे.
-
मार्च महिन्यात साहद बाळाला जन्म देणार असून त्यानंतर तो त्यांची ट्रान्स मॅनची हार्मोन थेरेपी पुन्हा सुरू करणार आहे. (सर्व फोटो: झिया/ इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO