-
खासदार स्मृती इराणी यांची मुलगी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
एकेकाळी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या स्मृती आता खरोखरच्या आयुष्यात सासू होणार आहेत.
-
शनैल ही स्मृती इराणी यांची सावत्र मुलगी आहे. शनैल ही झुबैन इराणी व मोना इराणी यांची मुलगी आहे.
-
शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शनेलचं लग्न आणि त्याचदरम्यानचे कार्यक्रम ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत.
-
यासाठी स्मृती इराणी अगदी जोरदार तयारी करत आहेत.
-
स्मृती इराणी यांच्या लेकीचं लग्न खिमसर किल्ल्यात होणार आहे.
-
याच किल्ल्यात शनैलचा होणारा पती अर्जुन भल्लाने तिला प्रपोज केलं होतं.
-
दोघांनी २०२१ च्या डिसेंबरमध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ते लग्न करणार आहेत.
-
त्यानिमित्ताने खिमसर किल्ला आतून कसा दिसतो, त्याचे फोटो पाहुयात.
-
राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये खिमसर किल्ला आहे.
-
५०० वर्ष जुना हा किल्ला जोधपूर व नागौरच्या मध्यभागी आहे.
-
या फोर्टमध्ये जवळपास ७१ खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यामध्ये ४ रेस्टॉरंटही आहेत. या किल्ल्याचं एका दिवसाचं भाडं २० हजार रुपये आहे.
-
१८ ऐसपैस टेन्ट या किल्ल्यामध्ये बांधण्यात आले आहेत.
-
इतकंच नव्हे तर स्विमिंग पूल, जिम, स्पाही इथे उपलब्ध आहे.
-
(सर्व फोटो- (Photo: Khimsar Fort Website व सोशल मीडियावरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”