-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. ३० जून २०२२ रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
-
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊया.
-
बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात एकनाथ शिंदेंचे दोन बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत चार कोटींच्या घरात आहे.
-
याशिवाय ठाण्यातील एका बिल्डिंगमध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर फ्लॅटही आहे.
-
एकनाथ शिंदे सुरुवातीला राहत असलेल्या ठाण्यातील चाळीत अजूनही त्यांचं घर आहे.
-
तर ठाण्यातीलच एका इमारतीत त्यांच्या पत्नीच्या नावे व्यावसायिक मालमत्तेची नोंद आहे.
-
एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीने महाबळेश्वर व शहापूर येथे शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. याची किंमत अनुक्रमे २५ लाख व तीन लाख अशी आहे.
-
एलआयसीमध्ये एकनाथ शिंदेंनी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीच्या नावावर ७ गाड्यांची नोंद आहे.
-
स्कॉर्पिओ, इनोवा, बलेरो या महागड्या गाड्यांचा त्यात समावेश आहे.
-
या गाड्यांची एकूण किंमत ४६ लाख ५५ हजार इतकी आहे.
-
एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीकडे २५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकूण ११ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
-
त्यांनी व त्यांच्या पत्नीने मिळून तीन कोटी ७४ लाखांचं कर्ज घेतलेलं आहे.
-
वरील सर्व माहिती एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीवर आधारित आहे.(सर्व फोटो: एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल