-
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘लिव्ह इन रिलेशन’बाबत मोठं विधान केलं आहे.
-
मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही’लिव्ह इन रिलेशन’बाबत ऐकलं नव्हतं. पण आजच्या पिढीकडून हे सगळं ऐकतं आहे. – खासदार नवनीत राणा
-
आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. पण तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांबरोबर‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात. -खासदार नवनीत राणा
-
मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली? – खासदार नवनीत राणा
-
मी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर हे पाहत असते. याचं माझ्या मनात कुठेना कुठे तरी दु:ख आहे. आपल्या तरुण पिढीत ही गोष्ट नेमकी कुठून आली? – खासदार नवनीत राणा
-
आपण स्वावलंबी झालो आहोत. पण आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं आहे. – खासदार नवनीत राणा
-
थोडे पैसे कमवायलो लागलो म्हणून असं वागायचं का? ही आपली संस्कृती नाही. आई-वडिलांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. आता आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. देवाने प्रत्येकाला काही ना काही तरी करायला पाठवलं आहे. – खासदार नवनीत राणा
-
समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. समाजाने आपल्याला राहण्याची पद्धत शिकवली. समाजाने आपल्याला नाव दिलं. -खासदार नवनीत राणा
-
आपणही समाजाचं काहीतरी देणं राखतो. आपण समाजासाठी किमान दहा टक्के दिलं तरी खूप झालं, हे करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.-खासदार नवनीत राणा

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा