-
भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासोबत सेल्फी घेण्यावरुन झालेल्या वादानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सपना गिल हे नाव आणखी चर्चेत आले. सोशल मीडियावर सक्रीय असणारी मॉडेल आणि भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या सपना गिलबद्दल जाणून घेऊयात.
-
मुळात पृथ्वी सोबत काय वाद झाला, ते आपण समजून घेऊया ज्यामुळे सपना गिल रातोरात ट्रेडिंगचा विषय ठरली.
-
वांद्रे पश्चिम येथील व्यावसायिक आशिष यादव व त्यांचे मित्र क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉकडे सेल्फी काढण्याचा आग्रह धरला.
-
पृथ्वी शॉने सपना आणि तिच्या मित्रासोबत सेल्फी काढला. पण ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करू लागले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले.
-
हॉटेलमधून बाहेर काढल्यानंतर संतप्त झालेल्या गिल व ठाकूर यांनी इतर साथीदारांना तेथे बोलावले. तसेच आशिष यादव आणि पृथ्वी शॉशी वाद घालण्यास सुरुवात केली.
-
एवढंच नाही तर सपना आणि तिच्या मित्राने यादव यांच्या बीएमडब्ल्यू गाडीचा पाठलाग केला आणि लोटस पेट्रोल पंपजवळ बेसबॉल स्टीकने त्यांच्या गाडीची पुढची व मागची काच फोडली.
-
याच पेट्रोल पंपावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉ सपना गिलच्या हातातून बेसबॉल स्टिक हिसकावताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सुरुवातीला पृथ्वीवर टीका झाली. मात्र सत्य बाहेर आल्यानंतर सर्वांनीच पृथ्वी शॉचे कौतुक केले.
-
सपना गिल ही मुळची चंदीगढची राहणारी आहे. सध्या ती मुंबईत राहत असून मॉडेलिंग करते. तिने रवि किशन आणि दिनेश लाल यादव यांच्यासोबत भोजपुरी चित्रपटात काम केले आहे.
-
सपनाने ‘निरहुआ चलल लंडन’ आणि ‘मेरा वतन’ या चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच तिला ‘काशी अमरनाथ’ चित्रपटातील अभिनयाबद्दल सबरंग २०१८ हा बेस्ट डेब्यू फिमेल ॲक्टर हा पुरस्कार मिळाला आहे.
-
सोशल मीडियावर सपना चांगलीच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर काल पर्यंत २ लाख १८ हजार फॉलोअर होते. मात्र रात्रीपासून वादात सापडल्यानंतर तिचे फॉलोअर्सची संख्या वाढून आता २ लाख २२ हजार झाली आहे.
-
पृथ्वी शॉ सोबत वाद घातल्यानंतर गुरुवारी सपनाला अटक झाली. त्यानंतर शुक्रवारी (दि. १७ फेब्रुवारी) तिला अंधेरी येथील सत्र न्यायालयात हजर केले गेले.
-
सपनाने पृथ्वी शॉ सोबतचा वाद मिटवण्यासाठी पृथ्वीच्या मित्राकडे ५० हजारांची मागणी केली होती. मात्र यादव यांनी या मागणीला कोणताही थारा न देता थेट पोलीस स्थानक गाठून तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल