-
विविध राजकीय भूमिकेमुळे चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले.
-
राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे यांना ५ एप्रिल २०२२ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली.
-
‘किआन अमित ठाकरे’ असे त्यांच्या नातवाचे नाव आहे.
-
आता राज ठाकरेंचा नातू किआन ठाकरेचे काही गोड फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
-
नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर या ठिकाणी मनसेच्या वतीने सेल्फी पॉईंटचे उद्धाटन करण्यात आले.
-
या उद्धाटन सोहळ्याला राज ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली.
-
त्यावेळी राज ठाकरे हे त्यांच्या नातवाला कडेवर घेऊन पाहायला मिळाले.
-
यावेळी किआननेही या सेल्फी पॉईंटचा आनंद लुटला.
-
या फोटोमध्ये आजोबा राज ठाकरे आनंदात पाहायला मिळत आहेत.
-
यावेळी उपस्थित असलेल्या मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या नातवाबरोबर सेल्फीही काढला.
-
या फोटोत आजी, आजोबा आणि नातवाचे गोड बॉन्डिंगही पाहायला मिळाले.
-
मनसेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईंटला अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला. (सर्व फोटो मनसे अधिकृत/फेसबुक पेज)
Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक