-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खवय्ये आहेत हे सर्वच जाणतात. गडकरींना अस्सल भारतीय जेवणासह चायनीज खाण्याचीही आवड आहे.
-
मुंबईत शाहरुख खानच्या घराजवळ बांद्रा येथे असणाऱ्या ताज लँड्स एन्डमध्ये त्यांना भोजन करणे फार आवडते.
-
नितिन गडकरी सांगतात की ताज मध्ये एक स्वतंत्र चायनीज रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंट मध्ये डेव्हिड नावाचा एक शेफ आहे ज्याच्या हातचे जेवण मला फार आवडते.
-
एक दिवस गडकरींनी डेव्हिडला तू कुठून आला आहेस हे विचारलं असता तो म्हणाला की मी हॉंगकॉंगचा आहे. मला फिरायला आवडतं म्हणून इथे आलो आणि काम करत आहे.
-
मग गडकरींनी सहजच डेव्हिडला त्याचा पगार विचारला त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून गडकरींना विश्वासच बसत नव्हता.
-
डेव्हिडने सांगितले की त्याला एका दिवसाला तब्बल ५० हजार रुपये पगार आहे.
-
आश्चर्याची बाब म्हणजे नितीन गडकरी यांनी हा किस्सा इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात खूप आधी सांगितला होता.
-
आकडेवारी केल्यास ताज हॉटेलच्या शेफला महिन्याकाठी तब्बल १५ लाख रुपये पगार मिळत होता.
-
त्यामुळे आता बहुधा या शेफचा पगार वाढलेला असण्याची सुद्धा शक्यता आहे.
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना