-
बांधकामाच्या ठिकाणी अगदी कामगारांपासून ते मॅनेजर आणि इंजिनीअरपर्यंत वेगवेगळ्या स्तरावरील लोकं काम करत असतात. अशावेळी त्यांना ओळखणं कठीण असतं. (Photo: Pexels)
-
काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या पदावरून आणि पेशावरून ओळखण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे सेफ्टी हेल्मेट ठरवून दिलेले असतात. (Photo: Pexels)
-
पांढऱ्या रंगाचे हेल्मेट हे मॅनेजर, पर्यवेक्षक, कामगारांचा प्रमुख आणि अभियंता यांच्यासाठी नेमून दिलेले आहेत. (Photo: Pexels)
-
हिरव्या रंगाचे हेल्मट हे सुरक्षा निरीक्षक आणि नवीन कामगारांसाठी नेमलेले आहेत. (Photo: Freepik)
-
सामान्य मजूर आणि खोदकाम निगडित ऑपरेटर्ससाठी पिवळ्या रंगाचे हेल्मेट नेमलेले आहेत. (Photo: Pexels)
-
सुतार, इलेक्ट्रिशियन आणि इतर तांत्रिक बाबी हाताळणाऱ्यांना निळ्या रंगाचे सेफ्टी हेल्मेट दिले आहेत. (Photo: Pexels)
-
रस्ते बांधकाम करणारे कामगार हे केशरी रंगाचे हेल्मेट घालतात. (Photo: Pexels)
-
ज्यांना बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन तिथली माहिती जाणून घ्यायची आहे अशांना राखाडी रंगाचे हेल्मेट दिले जातात. (Photo: Pexels)
-
तपकिरी रंगाचे हेल्मेट हे वेल्डिंगची कामं करणाऱ्या कामगारांना नेमून दिलेली आहेत. (Photo: Pexels)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल