-
परदेशवारी करायची म्हटली कि सगळ्यात पहिले बजेटचा प्रश्न उद्भवतो, मग अशावेळी “पॉकेट फ्रेंडली’ देशांची सफर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
-
असे काही देश आहेत जिथे प्रत्येकी एक लाख रुपयात परदेश भ्रमंती करता येते.
-
निसर्गप्रेम, स्ट्रीट फूड, तसेच झिप- लायनिंग, कायकिंग आणि माऊंटन बाईकिंग अशा साहसी खेळांसाठी उत्तम ठिकाण म्हणजे फिलिपिन्स हा देश आहे.
-
अगदी बजेट नीट लक्षात ठेऊन वाहतूकीचा खर्च आणि राहण्यासाठी योग्य हॉस्टेलची निवड केल्यास तुमची फिलिपिन्सची सफर संस्मरणीय होऊ शकते.
-
एखाद्या संध्याकाळी हो ची मिन्ह शहरात फस्त केलेला ‘फह’ चा बाउल किंवा हा लॉन्ग बे मधील पाचूसारखं हिरवंगार पाणी, आणि सुंदरशी बेटं असा अविस्मरणीय काळ अनुभवायचं असेल तर व्हिएतनाम हा अगदी योग्य देश आहे.
-
शिवाय व्हिएतनाममध्ये राहण्याची सोय, खाणं अगदीच कमी खर्चिक आहे.
-
फक्त दुबई किंवा अबुधाबीच नाही तर शारजाह आणि अल आईन या शहरांनाही भेट द्यायचीय तसेच वाळवंटाची सफर, बुर्ज खलिफा, भव्य मशीद, आणि ऐतिहासिक संग्रहालये देखील पाहायची आहेत, तर मग युएईची सहल झालीच पाहिजे. राहण्यासाठीचा हॉटेलखर्च महाग पडत असेल तर एअर बीएनबी हा पर्याय तुम्ही निवडू शकता.
-
अगदी कलाकारांपासून ते सर्वसामान्य लोकांत थायलंडचं वेड आहे तेव्हा जर तुम्हाला भव्य मंदिरे, ट्रॉपिकल वातावरण, गजबजलेलं नाईट लाईफ अनुभवायचं असेल तर या देशात एक सुट्टीचा आस्वाद नक्की घ्या. सध्या थायलंडचे चलन म्हणजे १ थाय बाह्त २.३९ भारतीय रुपये इतके आहे.
-
सुंदर समुद्रकिनारे, गगनचुंबी इमारतीचं दृश्य आणि बोर्निओचे जंगल हे सगळं पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये अनुभवायचं असेल तर मलेशिया हि उत्तम निवड ठरू शकते.
-
ऐतिहासिक वास्तू, निवांत समुद्रकिनारा, निसर्गरम्य वातावरण आणि चहाचे मळे ह्या सगळ्याचा आनंद घ्यायचा असल्यास आपल्या शेजारील देश श्रीलंका हे उत्तम ठिकाण आहे.
-
वाहतूक खर्च आणि राहण्याची सोय यांवर योग्य विचार विनिमय करून नियोजन केल्यास श्रीलंकेची आठवड्याभराची सहल अवघ्या ५०००० रुपयांत देखील होऊ शकते.
-
(Photos: Pexels)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी