-
देशभरात सर्वत्र होळीची उत्सुकता असून ८ मार्चची सगळे आतुरतेते वाट पाहत आहेत. देशातील विविध राज्यात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. (Photos: Freepik)
-
देशातील विविध राज्यात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. (Photos: Freepik)
-
परंतु भारतातच अशी काही ठिकाणं आहेत जिथे होळी अजिबात साजरी केली जात नाही. (Photos: Freepik)
-
गुजरातमधील एका गावात अजिबात होळी साजरी केली जात नाही. (Photos: Freepik)
-
असं म्हणतात की या गावाला संतांचा शाप मिळाला होता आणि याचमुळे गेली २०० वर्षे इथे होळी साजरी झाली नाही. (Photos: Freepik)
-
तामिळनाडू राज्यातही बहुतांशी लोक होळी साजरी करत नाहीत. होळीच्या दिवशी तमिळ लोक मासी मागम साजरा करतात. (Photos: Freepik)
-
बुंदेलखंडातील सागर जिल्ह्यामधील हातखोर गावातील लोक होळी हा सण साजरा करत नाहीत. (Photos: Freepik)
-
या गावात होलिकेचे दहनदेखील केले जात नाही. देवीने स्वतः येऊन होळी साजरी करू नये असं सांगितलं असल्याचं इथे म्हणतात. (Photos: Freepik)
-
झारखंडमधील दुर्गापूर गावात गेली १०० वर्षे होळी साजरी नाही. (Photos: Freepik)
-
होळीच्या दिवशी इथल्या राजाच्या मुलाचा मृत्यू झाला होता आणि यामुळेच इथे होळी साजरी होत नाही. (Photos: Freepik)
-
उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात होळी साजरी होत नाही. (Photos: Freepik)
-
रुद्रप्रयागमधील क्विली, कुरझन या गावात रंगांची उधळण केली जात नाही. (Photos: loksattagraphics desk)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”