-
गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
-
रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले असून ६१७७१ मतांसह भाजपाचे हेमंत रासने दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
-
कसब्याची पोटनिवडणूक जिंकून भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणारे रवींद्र धंगेकर यांची राजकीय कारकिर्द जाणून घेऊयात.
-
धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास प्रवास राहिला आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे.
-
धंगेकरांनी मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.
-
या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं होतं. बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले होते.
-
रविंद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे.
-
धंगेकर यांनी २०१७ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
-
गेले २५ वर्ष ते नगरसेवक राहिले आहेत. पुण्याच्या राजकारणात रवींद्र धंगेकर यांचं मोठं नाव असून त्यांना जनतेचा पाठिंबा आहे.
-
नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी त्यांच्या विभागात बरीच विकासकामं केली.
-
मनसे, शिवसेना आणि नंतर काँग्रेस या तीन पक्षांत राजकीय प्रवास करणारे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ही पोटनिवडणूक खूप महत्त्वाची होती.
-
भाजपाच्या गिरीश बापट यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून धंगेकर ओळखले जातात.
-
तब्बल २८ वर्षांनी रवींद्र धंगेकर हे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात विजयी झाले आहेत.
-
(सर्व फोटो – रवींद्र धंगेकर यांच्या फेसबूकवरून साभार)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”