-
गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली.
-
या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी ठरले आहेत.
-
रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
-
पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.
-
गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे.
-
रवींद्र धंगेकरांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास आहे.
-
ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
-
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मनसेकडून तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत गिरीश बापट यांना त्यांनी तगडं आव्हान दिलं होतं.
-
नवख्या धंगेकरांकडून गिरीश बापट अवघ्या सात हजार मतांनी विजयी झाले होते.
-
महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळल्यानंतर रवींद्र धंगेकरांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता.
-
पुण्यातील कसबा भागाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
-
कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत माहिती पुरवली होती.
-
यानुसार रवींद्र धंगेकर एकूण ७.२० कोटींचे मालक आहेत.
-
(सर्व फोटो:रवींद्र धंगेकर/ इन्स्टाग्राम)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल