-
चिंचवडचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अश्विनी जगताप यांना पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळाली होती.
-
चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली असून अश्विनी जगताप यांनी ३६, ०९१ मतांनी विजय मिळवला आहे.
-
पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या अश्विनी जगताप पिंपरी चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार बनल्या आहेत.
-
मुळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या अश्विनी जगताप यांचे वडील पोलीस अधिकारी आहेत.
-
अश्विनी जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी पतीबरोबर त्या निवडणुकीचा प्रचार करताना दिसायच्या.
-
पती लक्ष्मण जगताप यांच्याप्रमाणेच अश्विनी यांनीही दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
-
भाजपाकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर अश्विनी जगताप यांनी त्यांच्याकडील एकूण संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला पुरवली होती.
-
अश्विनी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वत:चे वार्षिक उत्त्पन्न ६६.२६ लाख असल्याचं नमूद केलं आहे.
-
चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा.लि.मध्ये त्या संचालक आणि चंद्ररंग फार्म आणि नर्सरी मध्ये भागीदार आहेत.
-
जगताप दाम्पत्याकडे दोन कोटी २२ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आहेत.
-
अश्विनी जगताप १३.९१ कोटी संपत्तीच्या मालकीण आहेत.
-
तर त्यांचे पती लक्ष्मण जगताप यांच्या नावावर १८ कोटींची संपत्ती आहे.
-
जगताप दाम्पत्याची एकूण संपत्ती २७ कोटींच्या घरात आहे.
-
(सर्व फोटो:अश्विनी जगताप/ फेसबुक)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”