-
कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.
-
भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्यांशी झालेल्या चुरशीच्या लढतीत धंगेकरांनी बाजी मारली.
-
दुसरीकडे, या निवडणुकीत बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.
-
या निवडणुकीत बिचुकले यांना केवळ ४७ मतं मिळाली आहेत. येथील मतदारांनी बिचुकले यांच्यापेक्षा जास्त ‘नोटा’ला (NOTA) मतदान केलं आहे.
-
या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर अपक्ष उमेदवार बिचुकले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी पुण्यात राहत नाही. मी पुण्याचा नाहीये, मी सांगलीचा आहे,” असं बिचुकले म्हणाले.
-
या निवडणुकीत जनतेनं मला मतं का दिली नाहीत, तो जनतेचा प्रश्न आहे. तो माझा प्रश्न नाही – अभिजीत बिचुकले
-
मला मत का नाही दिलं? असं आम्ही जनतेला जाऊन विचारू शकत नाही. राजेशाही असती तर त्यांना दाखवलं असतं. भारतात लोकशाही आहे – अभिजीत बिचुकले
-
लोक सेल्फी काढतात, पण मत देत नाहीत, याबाबत विचारलं असता अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले, “मग मी जनतेला शिव्या देऊ का? लोकशाहीचा मार्ग जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढतो. शर्यत असून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही – अभिजीत बिचुकले
-
आता २०२४ विधानसभा निवडणूक हे माझं पुढील मिशन आहे. या निवडणुकीत पूर्ण विधानसभा जिंकून अलंकृता बिचुकले या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील- अभिजीत बिचुकले (सर्व फोटो- लोकसत्ता/संग्रहित)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच