-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अमृता या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात.
-
अमृता यांनी नुकतीच महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
यावेळी त्यांनी प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. परंतु, या ड्रेसमुळे अमृता यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
-
अनेकांनी अमृता यांच्या या फोटोवर कमेंट करत नाईट ड्रेस असं म्हटलं आहे.
-
एका नेटकऱ्याने “तुम्ही साडी घाला एक सुसंस्कृत आणि आपल्या संस्कृतीला पुढे न्या आणि तुम्ही चांगल्या पण दिसाल”, अशी कमेंट केली आहे.
-
तर दुसऱ्याने “मेकअपला उशीर झाला म्हणून ड्रेस बदलायचा राहून गेला वाटतं”, असं म्हटलं आहे.
-
“नाईट ड्रेस छान दिसतोय” अशी कमेंटही केली आहे.
-
“नाईट ड्रेस छान आहे” असंही एकाने म्हटलं आहे.
-
अमृता या पेशाने बँकर असून त्या गायिकाही आहेत. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
(सर्व फोटो: अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”