-
होळी म्हणजे रंगांचा उसत्व आणि त्यामुळे बाजारात रंग, पिचकाऱ्या अशा सगळ्या वस्तू विक्रीस सज्ज आहेत. (Photos: Freepik)
-
यंदा ६ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. (Photos: Freepik)
-
महाराष्ट्रात होलिकादहनाने या सणाला सुरुवात होते. होळीच्या आख्यायिकादेखील आपल्याला वडीलधाऱ्यांकडून ऐकायला मिळतात. (Photo: loksattagraphics desk)
-
मनातील वाईट विचारांचे दहन आपण या होळीत करायचे असते असे म्हणतात. (Photos: Freepik)
-
फाल्गुन कृष्ण पंचमीपासून रंगपंचमीला सुरुवात होते. धुलीवंदनापासून या वसंत उत्सवाला सुरुवात होऊन रंगपंचमीचे पाच दिवस हा सण साजरा केला जातो. (Photos: Freepik)
-
महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातही होळीचा, रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. (Photos: Freepik)
-
उत्तरप्रदेशात ‘लठमार’ या नावाने होळीचा सण साजरी केला जातो. (Photos: Freepik)
-
या लठमारला ‘बरसाना की होली’ असे ही म्हटले जाते. (Photos: Freepik)
-
यावेळी बरसानातील पुरुष आपल्या जोडीदाराची थट्टा करून त्यांना त्रास देतात आणि त्यावर स्त्रिया पुरुषांना बांबूच्या काठीने मारतात. (Photos: Freepik)
-
वृंदावनात साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीला ‘फुलों की होली’ असं म्हणतात. (Photos: Freepik)
-
वृंदावनात रंगांऐवजी फुलांचा वापर केला जातो. हे शांती आणि एकीचे प्रतीक मानले जाते. (Photos: Freepik)
-
हरियाणात ‘धुलांडी’ या नावाने होळी खेळली जात असून यावेळी वहिनी आणि दीर एकमेकांची मस्करी करतात आणि रंग लावतात. (Photos: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”