-
दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी होळीच्या पहिल्या दिवशी चेंदणी कोळीवाडा, चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने ‘एक गाव एक होळी’चे आयोजन करण्यात आले होते.
-
यावेळी सर्व आगरी कोळी बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात होळी साजरी केली.
-
पारंपरिक वस्त्रे परिधान करून सगळे एकत्र जमले होते.
-
पारंपरिक पद्धतीने कोळी स्त्रियांनी होळीची पूजा केली.
-
लहान मुले आणि मोठे सगळेच अगदी छान तयार होऊन सण साजरा करायला एकत्र जमली होती.
-
पारंपरिक कोळीगीते आणि कोळी बॅण्डवर सर्व कोळी बांधव ताल धरला.
-
होळीच्या पूजेनंतर होळीदहन केले जाते.
-
होळीचा सण साजरा करायला संपूर्ण कोळीवाडा उपस्थित असतो आणि मोठ्या दिमाखदार पद्धतीने सण साजरा केला गेला.
-
(छाया- दीपक जोशी/लोकसत्ता)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा