-
वाघाचे एकत्र कुटुंब दर्शन तसे दुर्मिळ, पण ‘जुनाबाई’ ही वाघीण पर्यटकांना कायम तिच्या बचड्यांह दर्शन देते.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कोलारामधील पाणवठ्यावर ‘जुनाबाई’ आणि ‘डागोबा’ व त्यांचे दोन शावक हे कुटुंब एकत्र तहान भागवताना वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांना दिसून आले.
-
‘जुनाबाई’ला सुरुवातीपासून पाहणारे सांगतात की ती आतापर्यंत पाचवेळा आई झाली आणि १७ बछड्यांची ती आई आहे.
-
‘जुनाबाई’चा दरारा देखील तेवढाच. जंगली कुत्र्यांनी एकदा या वाघिणीचा पाठलाग करत तिची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला.
-
सुमारे २० कुत्र्यांच्या टोळक्याने सुरुवातीला तिला हैराण केले. नंतर मात्र ती या रानकुत्र्यांवर धावून येत तिचे रौद्र रूप दाखवले.
-
‘जुनाबाई’चा पाठलाग करणाऱ्या रानकुत्र्यांना पळता भुई थोडी झाली.
-
जवळपास आठ वर्षांची ‘जुनाबाई’ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रातील ‘जुनाबाई’ मंदिराजवळ पहिल्यांदा दिसून आली.
-
त्यानंतर सातत्याने ती ताडोबा व्याघ्रप्रकल्पात दिसायला लागली आणि पर्यटकांची लाडकी झाली.
-
अनेक सेलिब्रिटी तिचे फॅन आहेत. अगदी ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर पासून तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा निवृत्त खेळाडू मॅथ्यू हेडन सुद्धा. सचिन तेंडुलकरने तर तब्बल दोन दिवस तिच्या दर्शनासाठी मदनापूर परिसरात मुक्काम ठोकला होता.
-
सर्व छायाचित्रे – इंद्रजित मडावी (हेही पाहा : ताडोबातील भानूसखिंडी (टी-१७) वाघीण)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य