-
Tadoba-Andhari National Park: ‘ज्युनिअर मोगली’ याचे वास्तव्य कायम बफर क्षेत्रात.
-
पर्यटक ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघ पाहण्यासाठी धाव घेतात.
-
‘ज्युनिअर मोगली’ मात्र बफरक्षेत्राची निवड करणाऱ्या पर्यटकांना दर्शन देतो.
-
‘झरणी’ वाघीण आणि ‘मोगली’ वाघ यांचा हा बछडा, पण याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
त्याचा काही वर्षांपूर्वीचा पावसाळ्यातील एक किस्सा चांगलाच गाजला.
-
पावसाळी वातावरण होते. तो झुडूपात लपला होता. समोरच्या वाटेवर रानगवा आला.
-
‘ज्युनिअर मोगली’ला पाहताच तो जोरजोरात आवाज करु लागला.
-
रानगवा आणि ‘ज्युनिअर मोगली’ दोघेही समोरासमोर आले आणि एकाच दिशेने पळू लागले.
-
पर्यटकांना वाटले रानगवा वाघावर हल्ला करत आहे, पण प्रत्यक्षात ‘ज्युनिअर मोगली’चा हल्ला परतावून लावण्याचा प्रयत्न रानगवा करत होता.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला वनक्षेत्रातील झरणी येथील त्याचा जन्म. नंतर झरी, पेठ इकडे त्याने अधिवास शोधला.
-
आताही तो मूल मार्गावरील केसलाघाट परिसरात आहे. ताडोबातील वाघा गाभा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत असताना ‘ज्युनिअर मोगली’ मात्र बफर क्षेत्रातून पर्यटकांना खुणावत आहे.
-
सर्व छायाचित्रे – मकरंद परदेशी (हेही पाहा : मदनापूरची राणी ‘जुनाबाई’)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का