-
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांची पत्नी राजश्री यादव यांना कन्यारत्न लाभलं आहे. राजश्री यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
-
राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची धाकटी सून रेचल उर्फ राजश्री यांनी दिल्लीतल्या एका रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे.
-
तेजस्वी आणि राजश्री आता आई-वडील झाले आहेत तर लालू प्रसाद यादव आजोबा झाले आहेत.
-
तेजस्वी यादव यांनी सोमवारी सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे फोटो शेअर कले आहेत. ते काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले होते.
-
तेजस्वी यांनी दोन ट्विट करून आपल्या मुलीचे ५ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ईश्वराने प्रसन्न होऊन कन्येच्या रुपात भेट पाठवली आहे.
-
दुसऱ्या ट्विटमध्ये तेजस्वी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. खूबसूरत अवर्णनीय एहसास (ही एक सुंदर अवर्णनीय भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.) असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.
-
यावेळी रुग्णालयात तेजस्वी यांच्यासोबत त्यांच्या बहिणीदेखील उपस्थित होत्या. चिमुकलीची मोठी आत्या मीसा भारती यांनी माध्यमांना सांगितलं की, आमच्या घरी एका गोड मुलीचं आगमन झालं आहे.
-
आपल्याला मुलगी व्हावी, अशी इच्छा तेजस्वी यादव यांनी आधीच व्यक्त केली होती.
-
तर मुलीची दुसरी आत्या रोहिणी आचार्य यांनीदेखील एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “बनकर नन्हीं सी परी, मेरे घर मेहमान आई है, खुशियों की संग सौगात लाई है, दादा-दादी बनने की खुशी में, मम्मी-पापा के चेहरे पे जो मुस्कान लाई है।”

पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल