-
प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
परंतु, या सोहळ्यात अंबानींच्या मोठ्या सुनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अंबांनींची मोठी सून व आकाश अंबानीची पत्नी श्लोका अंबानी दुसऱ्यांदा गरोदर आहे.
-
श्लोका अंबानीने या सोहळ्यासाठी खास गोल्डन रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची ओढणी असा पेहराव केला होता.
-
त्याबरोबर तिने छान ज्वेलरीही घातली होती.
-
तर आकाशने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी श्लोका स्कर्ट व टॉप अशा पेहरावात दिसून आली.
-
डॉली जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन श्लोकाचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये श्लोका बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता या दोघांनी ९ मार्च २०१९ रोजी लग्नगाठ बांधली.
-
१० डिसेंबर २०२० रोजी श्लोकाने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव पृथ्वी अंबानी असे ठेवले आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख