-
ताडोबा ही वाघाची खाण आणि या खाणीतून इतिहास रचणाऱ्या अनेक वाघांनी जन्म घेतलाय. ‘बबली’ ही वाघीण त्यातलीच एक.
-
पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून ताडोबा व्यवस्थापनाने गाभा क्षेत्रासोबतच बफर क्षेत्र देखील पर्यटनासाठी खुले केले.
-
त्या बफर क्षेत्रातूनच म्हणजे अलिझंझा प्रवेशद्वारातून डोकावणारी ‘बबली’ सर्वांच्या परिचयाची आणि मग सर्वांची लाडकी झाली.
-
सात महिन्यांपूर्वी ‘बबली’ने अलिझंझा परिसरात तीन बछड्याना जन्म दिला.
-
तेव्हापासून ती आणि तिचे बछडे पर्यटकांना खुणावत असतात.
-
कधी ती बछड्याना दूध पाजताना तर कधी बछडे तिच्या अंगावर खेळताना दिसतात.
-
कधीकधी तर ती शिकार करते आणि बछडे तिच्याकडे टक लावून बघत असतात. शिकारीचे धडे ते आतापासूनच गिरवत आहेत.
-
या ‘बबली’ला शिकार करतानाही अनेक पर्यटकांनी पाहिले आहे.
-
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर फेब्रुवारीत ताडोबात व्याघ्रदर्शनासाठी आला होता. त्यालाही ‘बबली’ आणि तिच्या बछड्यांनी मनसोक्त दर्शन दिले.
-
‘शिवाजी’ हा वाघ तिचे वडील असल्याचे सांगितले जाते. ती कधी अचानक झाडाझुडुपांमधून बाहेर येते. तर कधी उन्हाळ्यात मैलोनमैल चालल्यानंतर चिखलात जाऊन लोळते आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करते.
-
अलिझंझा प्रवेशद्वार आता ‘बबली’साठीच नाही तर झरणी, भानुसखिंडी वाघीण, छोटा मटका हा वाघ सुद्धा याच प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दिसतात.
-
सर्व छायाचित्रे – इंद्रजित मडावी (हेही पाहा : ताडोबाचा अनभिषिक्त सम्राट ‘मटकासुर’)
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल