-
Bajaj CT 100: बजाज सीटी 100 ही कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे. कंपनीचा दावा आहे की, CT 100 चे मायलेज ८० किमी आहे. बाईकची किंमत ५३,६९६ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
-
Bajaj Platina 100: बजाजच्या मोटारसायकची किंमत ५२,९१५ रुपये ते ६३,५७८ रुपये एक्स-शोरूम आहे. बाईकचे मायलेज ७५ kmpl पर्यंत आहे.
-
Bajaj Platina 110 H Gear: Platina मोटरसायकलचे मायलेज ७४ kmpl आहे. त्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर हे ६७,९०४ रुपयांना उपलब्ध आहे.
-
Hero HF Deluxe: ५०,९०० च्या एक्स-शोरूम किमतीत HF Deluxe मिळेल. त्याच्या मायलेजबद्दल बोलायचे तर ते सर्वाधिक आहे. मोटरसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये ८२ किमी अंतर कापते.
-
Hero Passion Pro: Passion Pro ही हिरो मोटोकॉर्पची लोकप्रिय बाईक आहे. या बाईकचे मायलेज ६५ किमी आहे. ही बाईक ७०,३७५ रुपये ते ७५,१०० रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.
-
Honda CB Shine: आता Honda CB Shine देखील सर्वात मायलेज देणार्या मोटारसायकलींमध्ये आपले स्थान निर्माण करते. बाईकची किंमत ७३,३५२ रुपये ते ७८,१४७ रुपये आहे आणि ६५ किमी पर्यंत मायलेज देते.
-
TVS Radeon: TVS Radeon तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मोटारसायकलचे मायलेज ७० किमी असून त्याची किंमत ५९,९०० रुपये ते ७१,०८२ रुपये आहे.
-
TVS Sport: TVS स्पोर्ट्स बाईकबद्दल बोलायचे झाले तर ती ५८,१३० ते ६४,६५५ रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. मोटरसायकलबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ७६.०४ Kmpl मायलेज देते.
-
TVS Star City Plus: TVS ची स्टार सिटी प्लस खूप लोकप्रिय आहे. मोटारसायकलची किंमत ६९,५०५ रुपये ते ७२,००५ रुपये आहे. याच्या मायलेजबद्दल सांगायचे तर ते ७० किमी पर्यंतचे मायलेज देते. (Photos-financialexpress)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य