-
Girl Wearing Bikini In Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतून ब्रा आणि मिनी स्कर्ट घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
-
संबंधित तरुणी ही विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदची बहीण तर नाही ना? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला.
-
आता अखेरीस या बिकिनी घातलेल्या मिस्ट्री गर्लचा उलगडा झाला आहे. आपण गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतून अशाच प्रकारे प्रवास करत आहोत, असा खुलासा तिने स्वतः केला आहे.
-
रिदम चन्ना असं या तरुणीचं नाव असून ती १९ वर्षांची आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रिदम चन्नाने सांगितलं, “मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे
-
हे मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाहीये. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? याची मला पर्वा नाही.
-
उर्फी जावेदला कॉपी करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझ्या एका मित्राने अलीकडेच मला उर्फीचा फोटो दाखवला. तोपर्यंत उर्फी कोण आहे? हे मला माहीत नव्हतं.”
-
मला दिल्लीच्या पिंक लाईनवर प्रवास करण्याची परवानगी नाकारली आहे. परंतु इतर कोणत्याही लाईनवर मला अशा समस्येचा सामना करावा लागला नाही,”
-
माझ्या कुटुंबियांना माझ्या कपड्यांची निवड आवडत नाही. मला माझ्या शेजाऱ्यांकडून धमक्या मिळतात. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? याची मला पर्वा नाही, असे रिदम म्हणाली.
-
“असे कपडे परिधान करण्याचा निर्णय एका दिवसात घेतला नाही. मी एका पुराणमतवादी कुटुंबातील आहे.
-
माझ्या घरात मला जे हवे होतं, ते करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे एकेदिवशी मी मला हवं तसं वागण्याचा निर्णय घेतला, कारण हे माझं जीवन आहे.
-
गेल्या अनेक महिन्यांपासून मी असाच प्रवास करत आहे. पण आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
१९ वर्षीय रिदम चन्ना ही एका ऍक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे तर तिला मॉडेलिंग करण्याची इच्छा आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ