-
संजय राऊत : अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. तसेच ते स्वाभिमानी आहेत, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. अजित पवार हे बाणेदार असं नेतृत्व आहे ते जाऊन मिंध्याप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही.
-
संजय राऊत : अंजली दमानिया यांना भाजपाकडून ही माहिती मिळाली असेल तर त्यांनी ती जाहीर केली असेल. अजितदादा असं काही करतील असं मला तरी वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण व्यक्तिगत काही निर्णय घेत असतात. परंतु मी अजित पवारांना जितकं ओळखतो, अलिकडे जे काही पाहिलंय त्यावरून सांगेन की, अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील, असं मला वाटत नाही.
-
सुप्रिया सुळे : “ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचं ट्वीट मी काही वाचलेलं नाही. पण त्यांनी काही लिहिलं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे”
-
सुप्रिया सुळे : “१५ मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”
-
नाना पटोले : अंजली दमानियांनी जे ट्वीट केलं आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. मी त्याबाबत जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. मात्र, माझं मत विचारायचं झाल्यास अजित पवार असं काही करतील किंबहूना ते भाजपाबरोबर जातील असं वाटत नाही.
-
दीपक केसरकर : अंजली दमानिया यांच्या प्रश्नांवर मी उत्तर द्यायला लागलो तर कसं व्हायचं. त्या ट्वीटबद्दल तुम्ही दमानियांना विचारलं पाहिजे. त्यांना तुम्ही विचारा की, सुप्रीम कोर्टाकडून त्यांना काही निरोप आला आहे का. मुळात सुप्रीम कोर्टाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे.
-
चंद्रशेखर बावनकुळे : जर-तरला काही अर्थ नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आत्ताच काही टिप्पणी करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान ठरेल. मला वाटतं आपण निकालाची वाट पाहायला हवी.
-
अजित पवार : अंजली दमानियांच्या दाव्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.”
-
अंजली दमानियांचं वक्तव्य काय होतं? : आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य