-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सध्या चर्चेत आहेत.
-
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेतृत्व करणारे रोहित पवार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अशी रोहित पवारांची ओळख आहे. रोहित पवारांनी नुकतीच ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
-
वैयक्तिक व राजकीय प्रश्नही रोहित पवारांना विचारण्यात आले.
-
या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
-
“शरद पवारांबरोबर तुमचं नेमकं नातं काय?” असा प्रश्नही रोहित पवारांना मुलाखतीत विचारला गेला.
-
यावर उत्तर देत रोहित पवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेलं नातं स्पष्ट केलं.
-
रोहित पवार म्हणाले, “शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचा मी नातू आहे.”
-
शरद पवार यांचे मोठे भाऊ अप्पासाहेब पवार यांना राजेंद्र व रणजीत ही दोन मुले आहेत.
-
त्यापैकी राजेंद्र पवार यांचे रोहित पवार हे पुत्र आहेत.
-
रोहित पवार यांनी कुंती पवार यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. (सर्व फोटो : रोहित पवार/ इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक