-
राष्ट्रवादी काँग्रेसन पक्षाचे युवा नेतृत्व अशी ओळख मिळवलेले आमदार रोहित पवार सध्या चर्चेत आहेत.
-
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेतृत्व करणारे रोहित पवार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
रोहित पवारांनी नुकतीच ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
-
वैयक्तिक व राजकीय प्रश्नही रोहित पवारांना या मुलाखतीत विचारण्यात आले.
-
कॉलेज जीवनापासून ते राजकीय कारकिर्दीवरील अनेक प्रश्नांची रोहित पवारांनी उत्तरे दिली.
-
या मुलाखतीत रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे का दिसतात? असा प्रश्न विचारण्यात आला.
-
यावर रोहित पवारांनी सुरुवातीला मिश्किलपणे उत्तर दिलं. “राष्ट्रवादीच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे दिसतात तेव्हा बरोबरचं चिन्ह दिसतं,” असं ते हसत म्हणाले.
-
नंतर यामागील कारण स्पष्ट करत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० वाजून १० मिनिटांनी झाली होती. म्हणून पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात नेहमी १० वाजून १० मिनिटे दिसतात.”
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ साली शरद पवार यांनी केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?