-
Mumbai-Pune Highway Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
या बसमध्ये एकूण ४१ जण प्रवास करत होते. त्यापैकी २७ जण गंभीर असून त्यांच्यावर जवळच्याच शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
-
मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेला होता. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला.
-
शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
-
घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
या बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यातल्या २७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली.
-
या अपघातात आतापर्यंत १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.
-
जखमी प्रवाशांपैकी १८ जणांवर एमजीएम रुग्णालयात, १० प्रवाशांवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये दो लहन मुलं, तीन महिला आणि २४ पुरुष आहेत.

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण