-
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
/या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
-
हा पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकांचा जनसमुदाय खारघरच्या मैदानात दाखल झाला होता. ही गर्दी पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अचंबित झाले. दोघांनीही आपल्या भाषणात या लाखोंच्या जनसागराचा उल्लेख केला.
-
लाखो लोक खारघरच्या या मैदानात सकाळपासूनच येत होते. त्यामुळे नवी मुंबईत खारखरच्या आसपासचे सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
-
मुंबई-पुणे महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह मिळालेली मिळालेली २५ लाख रुपये ही रक्कम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे.
-
या पुरस्कार सोहळ्याला आलेले प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “कोणत्याही प्रसिद्धी आणि आपेक्षेशिवाय सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला इतका मोठा जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तीभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो.”
-
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आप्पासाहेब म्हणाले की, “पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे”
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”