-
उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. (PC : Jansatta)
-
या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला. अतिक गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला अनेकदा न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं. या काळात अतिकच्या बातम्या देशभर पसरू लागल्या. त्याच्या हत्येनंतर त्याच्याबद्दलच्या अनेक बातम्या येऊ लागल्या आहेत. नुकतीच अतिकच्या संपत्तीविषयीची माहिती समोर आली आहे. (PC : Jansatta)
-
अतिक राजकारणात येण्यापूर्वी एक माफिया होता. त्याने काळ्या मार्गाने भरपूर पैसा कमावला असल्याचं बोललं जातं. तसेच राजकारणात आल्यानंतरही त्याच्या संपत्तीत वाढच झाली. (PC : Jansatta)
-
अतिकच्या संपूर्ण संपत्तीची माहिती उघड झालेली नसली तरी निवडणुकीच्या आधी प्रतिज्ञापत्रात सादर केलेली माहिती तसेच इतर दस्तावेजांच्या सहाय्याने जी माहिती सादर झाली आहे. त्यानुसार अतिक अब्जावधी रुपयांचा मालक होता. (PC : Jansatta)
-
अतिक पाच वेळा आमदार आणि एकदा खासदारदेखील झाला होता. (PC : Jansatta)
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अतिक अहमद नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढला होता. त्यावेळी त्याला एक हजार मतं देखील मिळाली नव्हती. (PC : Jansatta)
-
निवडणूक प्रतिज्ञापत्रात अतिकने स्वतःची संपत्ती २५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे जाहीर केले होते. (PC : Jansatta)
-
निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अतिककडे रोख साडेपाच लाख रुपये होते. त्याची पत्नी आणि मुलांकडे रोख साडेतीन लाख रूपये होते. (PC : Jansatta)
-
अतिकचे वेगवेगळ्या बँकांमध्ये १.३ कोटी रुपये जमा होते. तसेच अतिककडे पाच कार होत्या. या गाड्यांचं घोषित मूल्य हे ३० लाख रुपये इतकं सांगण्यात आलं होतं. (PC : Jansatta)
-
अतिककडे एक मारुती जिप्सी, एक महिंद्रा जीप, एक पिगो जीप, एक बजेरो आणि एक टोयोटा लँड क्रूझर कार आहे. (PC : Jansatta)
-
अतिककडे सोन्या-चांदीची कमी नव्हती. त्याने त्याच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं की, त्याच्या पत्नीकडे १.८ किलोच्या आसपास सोनं होतं. या सोन्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच त्याच्या पत्नीकडे चार किलो चांदीदेखील आहे. या चांदीची किंमत ३ लाख रुपये इतकी आहे.(PC : Jansatta)
-
अतिकविरोधात १६० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी अलिकडच्या काळात त्याच्यावर कारवाई करून त्याच्याकडील आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडील ११,६८४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे, याबाबतची माहिती एबीपी न्यूजने प्रसिद्ध केली आहे. (PC : Jansatta)

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य