-
Katrina BT3 Tigress: ‘ती’ बॉलिवूडची कॅटरिना कैफ नाही, पण बोर व्याघ्रप्रकल्पाची ती राणी आहे. तिचे डोळे अतिशय मोहक आणि चेहरा देखील. ती वाघीण असली तरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्री कॅटरिना कैफ पेक्षा कमी नाही.
-
त्यामुळेच ‘बीटीआर-३’ या वाघिणीला स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांनी ‘कॅटरिना’ या नावाने ओळख दिली.
-
तिची एक झलक बघण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात. तर तिच्या अदा टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये चढाओढ असते. एवढी ती लोकप्रिय आहे.
-
‘कॅटरिना’चा जन्म बोर व्याघ्रप्रकल्पातच झाला असून ती बारा-तेरा वर्षाची असल्याचे सांगितले जाते. सफारीदरम्यान पर्यटकांची जीप समोर गेली की हळूच ती झुडूपातून बाहेर निघते आणि पर्यटक वाहनाकडे वळून पाहते. हीच तिची खासियत आहे.
-
‘युवराज’, ‘पिंकी’ सह तिचे अनेक अपत्य आहेत. आतापर्यंत तिने चार ते पाचवेळा बछड्यांना जन्म दिला असून सुमारे तेरा बछड्यांची ती आई असल्याचे सांगितले जाते.
-
‘कॅटरिना’ ही एक सेलिब्रिटी वाघीण असून ‘कॉलरवाली'(सुमारे २७ बछड्यांना जन्म देणारी) या वाघिणीचा ती विक्रम मोडेल की काय, अशी चर्चा पर्यटकांमध्ये आहे.
-
‘कॅटरिना’मुळेच बोर व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या वाढली, असे म्हणले तर खोटे ठरणार नाही.
-
गेल्यावर्षी देखील तिने बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देत होती. बोर व्याघ्रप्रकल्पाचे गाभा क्षेत्र हा तिचा अधिवास आहे. म्हणूनच कदाचित तिला बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी असे संबोधले जाते.
-
सर्व छायाचित्रे – मनोज लाखे (हेही पाहा : अलिझंझाची राणी ‘बबली’)
![IND vs ENG Shubman Gill touched his head after Adil Rashid clean bowled Axar Patel video viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-75.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल