-
विविध राजकीय भूमिकेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कायमच चर्चेत असतात.
-
राज ठाकरे यांचा कायमच सर्वत्र दरारा पाहायला मिळतो.
-
राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
-
त्यांची भाषणं व मुलाखती कायमच चर्चेचा विषय असतात.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राज ठाकरेंची मुलाखत घेतली.
-
या मुलाखतीत अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना काही प्रश्न विचारले.
-
या मुलाखतीदरम्यान त्यांच्याबरोबर रॅपिड फायर राऊंड खेळण्यात आला.
-
त्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
-
यावेळी अमोल कोल्हेंनी राज ठाकरे यांना घरात कोणाचं जास्त ऐकतात? असे विचारले.
-
सौभाग्यवती शर्मिला वहिनींचं की किआन अमित ठाकरेंचं, असे दोन पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले.
-
त्यावर शर्मिला ठाकरेंनी बोटांनी दोन असं सांगत अप्रत्यक्षरित्या किआन असं उत्तर दिलं.
-
त्यानंतर राज ठाकरेंनी “मी कोणाचं ऐकतो असं म्हणतं, मी ऐकलंय असं मी दाखवतो”, असे मिश्किलपणे हसत म्हणाले.
-
“पण मी सर्वांचेच ऐकतो”, असे शर्मिला ठाकरे म्हणाले.
-
राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे यांना ५ एप्रिल २०२२ ला पुत्ररत्न प्राप्ती झाली.
-
‘किआन अमित ठाकरे’ असे राज ठाकरेंच्या नातवाचे नाव आहे.
-
सर्व फोटो – मनसे अधिकृत/ फेसबुक
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”