-
अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ची ओळख आहे.
-
क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्ष उलटली असली तरी सचिनच्या खेळाची जादू जराही कमी झालेली नाही.
-
जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे क्रिकेट पोहोचलं आहे, तिथे तिथे सचिन तेंडुलकर हे नाव पोहोचलं आहे.
-
आता दुसरीकडे चर्चा आहे, सचिन तेंडुलकर यांचा धाकटा मुलगा अर्जुन सचिन तेंडुलकरची. (Photo-
arjuntendulkar24 instagram) -
सध्या आयपीएलमध्ये अर्जुनच्याच नावाची चर्चा आहे.
-
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील तेंडुलकर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी पुढे पाऊल टाकले आहे.
-
अर्जुन तेंडुलकर हा डाव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज देखील आहे.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेलच… पण अर्जुनचं शिक्षण किती झालंय, तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया…
-
अर्जुन तेंडुलकरने केवळ बारावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले नाही, तर देशातील प्रतिष्ठित विद्यापीठातून पदवी देखील घेतली आहे.
-
अर्जुन तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.
-
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. मात्र, तो कोणत्या विषयातून पदवीधर झाला आहे, याची माहिती सध्या उपलब्ध नाही.
-
(संग्रहित छायाचित्र)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल