-
गौतमी पाटील हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. काहीजण तिच्यावर टीका करण्यासाठी तर काही कौतुकासाठी बोलतात. पण तिच्यावर बोलणं मात्र थांबवत नाहीत.
-
याच चाहत्यांनी गौतमीला आजवर फक्त प्रेम व मानधन नाही तर भरपूर गिफ्ट्स सुद्धा दिली आहेत. यातीलच एका गिफ्टवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
गौतमीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांनी तिची काढलेली चित्रे, फोटो दाखवत खास पोस्ट केली होती. यावेळी तिने सर्वांचे आभार सुद्धा मानले होते.
-
गौतमीच्या भन्नाट पोजवरून हाताने रेखाटलेली चित्र पाहून तिचे फॅन्स भलतेच आनंदून गेले होते.
-
गौतमीच्या काही फॅन्सनी या फोटोवर कमेंट करताना आम्ही तुझ्यासाठी कविता केल्यात निबंध लिहिलेत असेही म्हंटले होते
-
मात्र याच फोटोमधील एका चित्रावर मात्र नेटकरी नाराज झाले आहेत. तसेच काहींनी यावरून गौतमीवर सडकून टीका सुद्धा केली आहे.
-
या फोटोमध्ये गौतमी विठ्ठल- रखुमाईची मूर्ती हातात घेऊन उभी आहे तर तिच्यामागे विठ्ठलाचा फोटो लावण्यात आला आहे.
-
हा फोटो पाहून काही टीकाकारांनी गौतमीच्या जुन्या चुका पुन्हा आठवून तिला विठ्ठलाजवळ उभं करण्याची काय गरज होती असे म्हणत कमेंट केल्या आहेत

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”